Advertisement

कोरोनाच्या संकटात राजकारण नको, वांद्र्यातील घटनेवर शरद पवारांचं भाष्य

वांद्र्यात घडलेली घटना दुर्दैवी होती. कुणीतरी आवई उठवल्याने लाेकं मोठ्या प्रमाणात जमले. तिथं सोशल डिस्टन्सिगचा नियम पाळण्यात आला नाही. सध्या देशात संकट असताना राजकारण करणं योग्य नाही.

कोरोनाच्या संकटात राजकारण नको, वांद्र्यातील घटनेवर शरद पवारांचं भाष्य
SHARES

वांद्र्यात घडलेली घटना दुर्दैवी होती. कुणीतरी आवई उठवल्याने लाेकं मोठ्या प्रमाणात जमले. तिथं सोशल डिस्टन्सिगचा नियम पाळण्यात आला नाही. सध्या देशात संकट असताना राजकारण करणं योग्य नाही. कोरोनाचा (coronavirus) पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असला पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी वांद्र्यातील घटनेवर भाष्य केलं. पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या (facebook) माध्यमातून बुधवार १५ एप्रिल रोजी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दुर्दैवी प्रसंग

यासंदर्भात पवार म्हणाले की, वांद्रे रेल्वे स्थानकावर (rush at bandra railway station) घडलेला प्रसंग दुर्दैवी होता. रेल्वे सुरू होणार, राज्याबाहेर जाण्याची संधी उपलब्ध होणार, अशी आवई कुणीतरी उठवली आणि आजूबाजूच्या परिसरातले लोकं मोठ्या संख्येने तिथं जमले. यामुळे सोशल डिस्टन्सिगच्या (social distancing) बाबतीत ज्या सूचना देण्यात येतात, त्या पाळण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांच्या बळाचा उपयोग करावा लागला. त्यामुळे कुणीही काहीही करून गोंधळ निर्माण होईल, अशा प्रकारच्या सूचना देता कामा नये. असा प्रसंग पुन्हा घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

हेही वाचा- लोकलसह मेल-एक्स्प्रेस ३ मे पर्यंत बंद

लाभ उठवू नका

राजकीय पक्षाच्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की राजकीय संघर्ष हा आपण नेहमीच करत असतो, त्यात काही चुकीचं नाही. लोकशाहीत या गोष्टी चालतात. पण संपूर्ण देशावरच संकट असताना आपण त्याचा लाभ उठवू असा विचार करण्याची आताची स्थिती नाही. त्यामुळे कुठल्या पक्षाचं सरकार आहे. केंद्रात कुणाची सत्ता आहे याचा विचार न करता आपण सर्वांनी मिळून कोरोनाचा पराभव करायचा हा एककलमी कार्यक्रम समोर ठेवून त्या दिशेने पावलं टाकली पाहिजे.  वांद्र्यात घडलेली घटना पुन्हा होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. अस्वस्थ असलेल्या समाजाचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. 

हेही वाचा- बेकायदेशीररित्या जमलेल्या 'त्या' जमावा विरोधात गुुन्हा दाखल 

स्वयंसेवी संस्थांकडून मदत

परप्रांतीय कामगार हे आता आपल्या गावी जाण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतु राष्ट्र पातळीवर जे धोरण ठरले आहे, त्यानुसार त्यांना प्रवास करण्याची सुविधा आपण देऊ शकत नाही. मात्र, त्यांना अन्न व आरोग्य सुविधा देण्यासाठी आपले प्रशासन तसेच अन्य सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटक पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षाचे घटकदेखील यात उतरले आहेत. यात कोणी राजकारण आणू नये. स्वतःची चिंता न करता समोरच्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतो आहे, असंही पवार म्हणाले.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा