आपल्या लाईफस्टाइलमध्ये बदल करायची हीच वेळ- शरद पवार

सध्याची परिस्थिती पाहता भविष्याच्या दृष्टीकोनातून आपल्या लाईफस्टाइलमध्येही बदल करण्याची वेळ आली आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

आपल्या लाईफस्टाइलमध्ये बदल करायची हीच वेळ- शरद पवार
SHARES

कोरोनाचं संकट (coronavirus) आपल्यापासून सर्वजण घरात बसले आहेत, सर्वांनाच आरोग्याबाबतच्या सूचना सातत्याने करण्यात येत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भविष्याच्या दृष्टीकोनातून आपल्या लाईफस्टाइलमध्येही बदल करण्याची वेळ आली आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp chief sharad pawar) यांनी दिला. सोमवारी सोशल मीडियावरून राज्यातील जनतेशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.   

आणखी २आठवडे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कोरोनासंदर्भात जनतेला घरी थांबण्याचं आवाहन करून एक आठवडा पूर्ण झाला आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनीही देशाला संबोधित केलं तो कालावधी धरला तर ३ आठवड्याचा कालावधी होतो. त्यामुळे आता आणखी २ आठवडे सूचना पाळायच्या आहेत. 

हेही वाचा- Coronavirus: हे अन्न फक्त मुस्लिमांसाठीच... पाकिस्तानात हिंदूंसोबत असाही भेदभाव!

सूचना पाळा

एकंदर परिस्थिती पाहिल्यास आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. इतर ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या काही लोक पाळताना दिसत नाहीत. रस्त्यावर काही लोक फिरत आहेत असे दिसते. पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रसंग येतोय. ही वेळ पोलिसांवर आपण नको आणूया.  

आणखी दोन आठवडे आपण बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही, हा निर्धार करूया. मीसुद्धा या दिवसांत कोणाला भेटलेलो नाही, घराबाहेर अजिबात पडलेलो नाही, जो काही संपर्क साधला तो दूरध्वनीवरून किंवा आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून साधलेला आहे. 

खबरदारी घ्या

यावेळी खरी गरज सोशल डिस्टन्स पाळण्याची आहे, ते आपण करूया. गर्दी टाळून परस्परांशी संपर्क साध्या. योग्य ती काळजी आपण दोन आठवडे घेतली पाहिजे वा आणखी काही दिवस खबरदारी घ्यावी लागल्यास करावी लागेल. आपण त्याची तयारी करूया. 

हेही वाचा- Coronavirus Update: अखेर राज्य सरकारने लावली परप्रांतीयांच्या खाण्यापिण्याची सोय!

यातून आपण काही शिकतोय का? हा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतंय की आपण काही शिकलो आणि जे अनुभव आपण घेतले ते आपल्याला इथून पुढच्या दैनंदिन जीवनात सुद्धा पाळावे लागतील. विशेषतः लाईफस्टाईल विषयक आपल्या काही सवयी आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल.

संबंधित विषय