Advertisement

आंबेडकर जयंती, शब-ए-बारात चे सोहळे टाळा, शरद पवार यांचा सल्ला

यंदाच्या वर्षी शब-ए-बारात आणि आंबेडकर जयंतीचे सोहळे टाळण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp chief Sharad pawar) यांनी केलं.

आंबेडकर जयंती, शब-ए-बारात चे सोहळे टाळा, शरद पवार यांचा सल्ला
SHARES

दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी जमातनं आयोजित केलेल्या 'मरकज'मुळं सध्या देशभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शब-ए-बारात आणि आंबेडकर जयंतीचे सोहळे टाळण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp chief Sharad pawar) यांनी केलं. पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गुरूवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

 

हेही वाचा - आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा

मरकज टाळता आला असता

देशभरात लाॅकडाऊन करण्यात आल्याने सर्वधर्मीय देवालय, प्रार्थनास्थळांना सुद्धा बंद ठेवण्यात आलं आहे. असं असूनही दिल्लीतील नियामुद्दीनमध्ये मर्कजच्या कार्यक्रमाचं (markaz programme at nizamuddin delhi) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यातील ठिकठिकाणाहून हजारो मुस्लिम बांधव गेले होते. मरकज'हून परतल्यानंतर त्यातील अनेकांना कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यातील बहुतेक जणांनी एकत्र प्रवास केल्याने हा कोरोनाचा संसर्ग इतरांनाही झाल्याचं नाकारता येत नाही. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता. कारण त्याचा देशभरात परिणाम झाला आहे. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये.

सोहळे नंतर करा

येत्या ८ एप्रिल रोजी मुस्लिमांची 'शब-ए-बारात' आहे. या दिवशी हयात नसलेल्या पूर्वजांची आठवण काढण्यात येते. मुस्लिम बांधव एकत्र जमून हा विधी करतात. मात्र, यावेळी घरात राहूनच हा विधी व्हायला हवा. शिवाय मुस्लिम बांधवांनी घरातूच नमाज अदा करावी. त्यानंतर १४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (postpone ambedkar jayanti and sheb e barat programme) आहे. या दिवशी आपण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणारच आहोत. पण जयंतीनिमित्ताने दरवर्षी होणारे साेहळे आपण टाळायला हवेत. एरवी आपण बाबासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम महिनाभर करत असतो. त्यामुळं हा कार्यक्रम नंतर केला तरी फारशी अडचण येणार नाही, असं आवाहन पवार यांनी केलं. 

हेही वाचा- आपल्या लाईफस्टाइलमध्ये बदल करायची हीच वेळ- शरद पवार

बाजारात गर्दी नको

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रशासनाकडून जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यातील ९० टक्के जनता नियमांचं पालन करत असली, तरी १० टक्के लोकांकडून अजूनही बेजबाबदारपणा दाखवला जात आहे. बाजारपेठांमध्ये अजूनही गर्दी होत आहे. आपल्याकडे अन्नधान्य, भाजीपाल्याची कमतरता नाही. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा होत आहे. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी जनतेने उगाच गर्दी करू नये,असंही शरद पवार म्हणाले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा