Advertisement

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना हायकोर्टाचा दणका

आज दिल्ली हाय कोर्टात सुनावणी झाली.

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना हायकोर्टाचा दणका
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या मानहानी याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या दाव्याची एक याचिका दाखल केली. याबाबत आज दिल्ली हाय कोर्टात सुनावणी झाली.

वरिष्ठ वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने बदनामीकारक विधानांचे गांभीर्य लक्षात घेऊन, अर्ज स्वीकारला आहे. हा अर्ज स्विकारताना संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना न्यायालयात हजर राहून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे समन्स बजावले आहे.

न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध मनाई आदेश का काढू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी खासदार आणि आमदारांविरोधात कोणतीही बदनामीकारक विधाने रोखली, असे म्हटले आहे.

कोर्टाने गूगल, ट्विटर, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना 30 दिवसांच्या आत तुमच्या यूट्यूब आणि ट्विटरवरील मजकूर का काढू नये, अशी विचारणा केली आहे. तुमचे काही जे म्हणणे आहे ते लेखी दाखल करा, असे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणी आता 17 एप्रिल रोजी अंतरिम सुनावणी होणार आहे.



हेही वाचा

उद्धव ठाकरे-भाजप युती पुन्हा होणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची राज्य सरकारची योजना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा