'महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकेल'

 Goregaon
'महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकेल'
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांची नुकतीच गोरेगांवमधील नियोजित समाजमंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कोणी कितीही डावपेच खेळले, तरी शिवसेना त्यांना चारही मुंड्या चीत करेल. तसेच या वेळीही पालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. जोगेश्वरी, गोरेगाव हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरसेवक, महापौर आणि आता आमदार झालेल्या सुनील प्रभू यांनी या विभागात विकास घडवून आणला आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Loading Comments