उद्धव ठाकरेंनी माझा फोन घेतला नाही – देवेंद्र फडणवीस

पत्रकार परिषदेत देवेेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आम्ही चर्चा थांबवलेली नाही. आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती. मात्र, शिवसेनेकडून चर्चा बंद झाली.

SHARE

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी अनेक फोन केले. मात्र, त्यांनी ते फोन उचलले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सह्यादी अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. 

पत्रकार परिषदेत देवेेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

आम्ही चर्चा थांबवलेली नाही. आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती. मात्र, शिवसेनेकडून चर्चा बंद झाली. उद्धव ठाकरे यांनी माझे फोन उचलले नाहीत. ज्यांच्याविरोधात आम्ही मतं मागून निवडून आलो त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत दिवसातून ३ वेळा चर्चा करायला वेळ होता. पण शिवसेनेला आमच्याशी चर्चा करायला वेळ नव्हता, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. 

आम्हाला उत्तर देता येत नाही असं कुणी समजू नये.  जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यातही आहे.  पण आम्ही उत्तर देणार नाही. एकवेळ विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली टिका समजू शकतो. पण आमच्या बरोबर केंद्रात आणि राज्यात रहायचं आणि आमच्यावर टीका करायची हे चालणार नाही, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं. 

यावेळी भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले. फोडाफोडीचे राजकारण आम्ही कधीही केलेले नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत, असं त्यांनी यावेळी विरोधकांना दिलं.हेही वाचा  -

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

वाचाळविरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीका
संबंधित विषय
ताज्या बातम्या