Advertisement

“आम्ही भिकारी नाही”, अजित पवारांवर फडणवीस संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले आणि आम्ही भिकारी नाहीत, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“आम्ही भिकारी नाही”, अजित पवारांवर फडणवीस संतापले
SHARES

तब्बल ७२ दिवस उलटूनही वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना न झाल्याने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले आणि आम्ही भिकारी नाहीत, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना ७२ दिवस झाले तरी सरकारने केलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यातील जनताही महाराष्ट्रातील आहे हे लक्षात‌ ठेवावं. राजकीय डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये. या सभागृहात मला कोरोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं. अजित पवार ७२ दिवसांपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहेत की नाही एवढंच सांगावं,असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना अजित पवार (ajit pawar) म्हणाले, आम्ही वैधानिक विकास महामंडळ स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. या महामंडळांसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करू. मात्र मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे. तो असा की ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करण्यात येतील त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु, असं सडेतोड उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. विरोधक गदारोळ घालू लागल्यावर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी त्यांना सुनावलं.

हेही वाचा- ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर होतील.., अजित पवारांचं भन्नाट उत्तर

या उत्तरावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) चांगलेच संतापले. मी अजितदादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. १२ आमदारांकरीता विदर्भ, मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवलं. वैधानिक विकास महामंडळं आमच्या हातात होती म्हणून तुम्हाला बजेट पुन्हा मागे घ्यावं लागलं होतं, हे तुम्हाला चांगलच आठवत असेल. त्यानंतर बजेटमध्ये विदर्भ, मराठवाड्याच्या निधीचा समावेश करावा लागला होता. 

१२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा राज्यपाल आणि तुमच्यातला आहे. या सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला त्याचं काय देणघेणं आहे? राज्यपाल हे कुठल्याही पक्षाचे नाहीत, ते एक पद आहे. विदर्भ, मराठवाड्याचा निधी म्हणजे भीक नव्हे, आम्ही भिकारी नाही. हे त्यांच्या हक्काचं आहे, तुम्ही हा निधी दिला नाही, तर आम्ही त्यासाठी संघर्ष करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

(devendra fadnavis slams ajit pawar on statutory development corporation appointment in maharashtra assembly budget session 2021)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा