Advertisement

कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता, पुन्हा नव्याने अधिसूचना काढा- देवेंद्र फडणवीस

सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता, पुन्हा नव्याने अधिसूचना काढा- देवेंद्र फडणवीस
SHARES

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसातील अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे तत्काळ पाऊलं उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसंच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना केली आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रात पसरत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी कडक निर्बंध जारी केले आहेत. या माध्यमातून सरकारने विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार ५ एप्रिलपासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु या निर्बंधांमुळे छोटे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांना मोठा फ टका बसणार असून हे निर्बंध मागे घेण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. 

त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रकारे इतरही ५ दिवस लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.

हेही वाचा- मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला जबर झटका, तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लाॅकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर्स पार्टस दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला (coronavirus) रोखणं महत्त्वाचं आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो.

असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या कळीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

(devendra fadnavis wrote a letter to cm uddhav thackeray on strict restrictions on maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा