Advertisement

राजू शेट्टींच्या आमदारकीचा मार्ग मोकळा, नेत्यांमधील वाद मिटला

राजू शेट्टी यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेट्टी यांच्या आमदारकीवरून संघटनेत मतभेद झाल्यानंतर नको ती विधान परिषदेची ब्याद म्हणत शेट्टी यांनी साेशल मीडियावर जाहीर भूमिका मांडली होती.

राजू शेट्टींच्या आमदारकीचा मार्ग मोकळा, नेत्यांमधील वाद मिटला
SHARES

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विधान परिषदेसाठी राजू शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा (dispute closed between raju shetti and swabhimani shetkari sanghatana leaders over mlc seat from ncp quota) झाला आहे. शेट्टी यांच्या आमदारकीवरून संघटनेत मतभेद झाल्यानंतर नको ती विधान परिषदेची ब्याद म्हणत शेट्टी यांनी साेशल मीडियावर जाहीर भूमिका मांडली होती. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी रात्री उशिरा एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात म्हटलं आहे की, आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवारातील ज्येष्ठ नेते आज एकत्र जमलो. कळत न कळत आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाले होते ते सर्व संपले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ होती व नेहमीच एकसंघ राहिल. कारण आम्ही सर्वजण शेतकरी हिताशी बांधील आहोत. आमच्यामध्ये आता कसलेही मतभेद उरले नाहीत. आम्ही सर्वजण एकदिलाने, एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करू, असं नमूद करण्यात आलं आहे. या बैठकीला राजू शेटटी यांच्यासोबत  प्रा. डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, डाॅ. महावीर अक्कोळे, पै. विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील,अजित पवार, डाॅ. श्रीवर्धन पाटील यांचा समावेश होता.

हेही वाचा - विधान परिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली?

राजू शेट्टी यांच्या नावाला प्रा. डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांचा प्रामुख्याने विरोध होता. परंतु शेट्टी यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत दोघांचीही नाराजी दूर करण्यात शेट्टी यांना यश आलं. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा वाद मिटविण्यात आला, असं बैठकीनंतर सांगण्यात आलं.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच रिक्त होणार आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या ४ जागेपैकी एका जागेवर राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर संघटनेतील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माझ्या आमदारकीमुळे संघटनेत फूट पडणार असेल, तर नको ती विधान परिषदेची ब्याद अशी जाहीर भूमिका शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडली होती.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा