Advertisement

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख असल्यास कारवाई

गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख असेल, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख असल्यास कारवाई
SHARES

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठासहीत राज्यातील इतर सर्व विद्यापीठाच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे ठराविक सूत्र वापरुन गुणपत्रिका देण्यात येणार आहे. अशा गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख असेल, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (do not mention covid 19 on marksheet says maharashtra agriculture minister dadaji bhuse) यांनी दिला आहे. 

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची गंभीर दखल दादाजी भुसे यांनी घेतली आहे. यासंदर्भात राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देखील भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

हेही वाचा - University Exams 2020: यूजीसीच्या सूचनेनुसार परीक्षा घ्याव्याच लागतील!

यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दादाजी भुसे यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही विद्यापीठांची नियामक संस्था आहे. राज्य शासनाला विश्वासात घेणं आयोगाच्या कक्षेत नाही. त्यामुळे यूजीसीने केलेल्या सूचना कायद्यानुसार विद्यापीठांना बंधनकारक आहेत, असं मत काही दिवसांपूर्वीच यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी मांडलं होतं.

कोरोनाचं संकट सुरू असताना काही विद्यापीठांनी परीक्षा देखील घेतल्या आहेत. शैक्षणिक लाइफ सायकलमध्ये परीक्षा हा महत्त्वाचा भाग आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय एखाद्याला पदवी देणं योग्य नाही. हे तात्पुरतं सोल्युशन असलं, तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची मार्कलिस्ट आयुष्यभर बाळगावी लागेल, याचा भविष्यकालीन विचार देखील करावा लागेल.  एमबीबीएसची परीक्षा न देताच उत्तीर्ण झालेल्याकडे आपण उपचारासाठी जाणार आहोत का? इंजिनियरने परीक्षा न देताच बांधलेल्या पुलाबाबत आपण खात्री बाळगणार आहोत का? असा प्रश्न देखील पटवर्धन यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - University Exams 2020: हा अहंकाराचा मुद्दा बनवू नका, परीक्षा घेण्यावरून आदित्य ठाकरेंची यूजीसीवर टीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा