Advertisement

ई-पासची अट काढून टाका- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने ई-पासची अट आता सरसकट काढून टाकण्याची गरज असल्याची भूमिका भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

ई-पासची अट काढून टाका- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रात प्रवासासाठी आवश्यक ई-पासची अट काढून टाकावी की तशीच ठेवावी, यावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू असल्याचं दिसून येत आहे. एका बाजूला एसटीतील प्रवाशांसाठी ई-पासची अट काढून टाकलेली असताना खासगी वाहनांसाठी हीच अट कायम ठेवण्यात काहीही अर्थ नाही, त्यामुळे राज्य सरकारने ई-पासची अट आता सरसकट काढून टाकण्याची गरज असल्याची भूमिका भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. (e pass restrictions for inter district travel in maharashtra should remove now says opposition leader devendra fadnavis)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस ई-पासच्या मुद्द्यावर म्हणाले की, राज्य सरकारच्या धोरणांमध्ये प्रचंड गोंधळ आणि विसंगतीसुद्धा आहे. एका बाजूला केंद्र सरकारने घेतलेले निर्णय इतर राज्यांमध्ये लागू होतात, परंतु महाराष्ट्रात ते लागू होताना दिसत नाही. मग माणसांच्या प्रवासाचा विषय असेल किंवा इतर विषय असतील, सगळ्याबाबतच हेच होत आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

सद्यस्थितीत ई-पासची गरज जवळपास संपलेलीच आहे. प्रवासी ई-पास शिवाय जाऊ शकतात, पण खासगी वाहनांना ई-पासची गरज लागते. लोकांना यावर अनेक मिम्स, व्यंग देखील तयार केलेत. त्यामुळे यावर तात्काळ निर्णय घेऊन ज्याप्रमाणे देशातून हा विषय संपला आहे, तसा महाराष्ट्रातूनही हा विषय संपला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अनलाॅकच्या प्रक्रियेनुसार आता 'केंद्र सरकारने वाहतुकीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं देखील केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. तरीही अद्याप महाराष्ट्रातील जिल्हांतर्गत प्रवासावरील ई-पासची अट कायम आहे.

महाराष्ट्रात केंद्र सरकारची अधिसूचना लागू करायची की नाही बाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा