Advertisement

एकनाथ खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

मुंबई हायकोर्टाने गुरूवारी खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. तोपर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कठोर कारवाई करणार नसल्याची आपली हमी कायम ठेवली आहे.

एकनाथ खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंत दिलासा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात ३ फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकेपासून ३ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम संरक्षण मिळालं आहे.

मुंबई हायकोर्टाने गुरूवारी खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. तोपर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कठोर कारवाई करणार नसल्याची आपली हमी कायम ठेवली आहे. एकनाथ खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जानेवारीला होत असून तो पर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली होती. यामुळे एकनाथ खडसे यांना २८ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला होता. मात्र,गुरूवारी या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी खडसे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवलं होतं. आपल्याला समन्स मिळाले नाही. समन्स मिळाल्यानंतरच आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असं खडसेंनी सांगितलं होतं.



हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा