Advertisement

खा. संजय राऊत अडचणीत, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

राऊत यांनी सामना वृत्तपत्रात ३१ मार्च रोजी लिहिलेल्या रोखठोक या सदरात निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना त्यांनी या वक्तव्यातून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे.

खा. संजय राऊत अडचणीत, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
SHARES

देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना सामना वृत्तपत्राचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वृत्तपत्रातील मजकुरात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमुळे राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे.


कारण काय?

राऊत यांनी सामना वृत्तपत्रात ३१ मार्च रोजी लिहिलेल्या रोखठोक या सदरात निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना त्यांनी या वक्तव्यातून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांना ३ एप्रिलपर्यंत बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे.


कुठलं अक्षेपार्ह वक्तव्य?

जेएनयूमधील विद्यार्थी नेता 'ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे तो कन्हैयाकुमार बिहारातील बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा लढत आहे. त्याने निवडणूक लढण्यासाठी लोकांकडे पैसा मागितला तेव्हा दहा मिनिटांत पाच लाख रुपये जमा झाले. हे चिंताजनक. दहशतवाद्यांना पैसे देणारे दहशतवाद्यांचे हस्तक. मग कन्हैयाकुमारच्या झोळीत पैसे टाकणारे कोण? बेगुसराय मतदारसंघात कन्हैयाकुमारचा दारुण पराभव करण्याची जबाबदारी भाजपची आहे, पण या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीराजसिंह यांनी मैदान सोडले आहे. ईव्हीएमचा घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल, पण या विषाच्या बाटल्या संसदेत पोहोचता कामा नयेत.', असं संजय राऊत यांनी आपल्या सदरात म्हटलं आहे.

हे सदर सामनात प्रसिद्ध झाल्यानंतर यावरून वाद निर्माण झाला. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेत त्यांना नोटीस पाठवली.हेही वाचा-

‘काँग्रेसमुक्त भारत’ भूमिकेला विरोध– उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा