Advertisement

युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत.

युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर
SHARES

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून वावड्या उठवल्या जात होत्या. या सर्व प्रश्नांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर पूर्णविराम देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील गेले होते. त्यावेळी प्रश्न आकडे आणि मानपानाचा नसून प्रश्न हा राज्यातील विविध योजना आणि नागरिकांच्या गरजेचा होता. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न शिवसेनेकडून ठेवण्यात आल्यानंतर त्यावर सकारात्मक चर्चा झाली. ते प्रश्न सोडवण्यास भाजपही आग्रही असून तिच मानसिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दोघांचंही या प्रश्नांवर एकमत झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अखेर शिवसेनेला राजी करण्यात भाजपाला यश आल्याचं समजतं.

अमित शाह आज मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे वरळी सीफेस इथल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी रवाना होणार असल्याचं समजतं. या पत्रकार परिषदेत शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसोबत मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   



हेही वाचा

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा -मुख्यमंत्री

मोदींच्या ‘मन की बात’ला काँग्रेसचे ‘जन की बात’द्वारे उत्तर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा