Advertisement

कोहिनूरप्रकरणी राज ठाकरे, उन्मेष जोशी ईडीच्या रडारवर?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

कोहिनूरप्रकरणी राज ठाकरे, उन्मेष जोशी ईडीच्या रडारवर?
SHARES

बुडीत निघालेली फायनान्स कंपनी आयएल अॅण्ड एफएस कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात सापडली आहे. या कंपनीनं अनेक ठिकाणी गुंतवणूक केली असून यामध्ये दादरमधील शिवाजी पार्क येथील 'कोहिनूर स्क्वेअर' चाही समावेश आहे. आयएल अॅण्ड एफएस कंपनीचे बरेच व्यवहार संशयास्पद आहेत. त्यामुळं या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का? या अनुषंगानं तपास सुरु आहे. विशेष म्हणजे  याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीकडून चौकशी

कोहिनूर स्क्वेअर टॉवर्समध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे. एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक ३ च्या जागेचा लिलाव काही वर्षांपूर्वी झाला. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव ४२१ कोटी रुपयांना झाला. ही जागा  उन्मेष जोशी यांच्या कंपनीनं विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते.

५०० कोटींचं कर्ज

उन्मेष जोशी यांच्या कंपनीला ५०० कोटींचं कर्ज दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्यानं त्या ५०० कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीनं निर्णय घेतला. २०११ मध्ये आयएल अॅण्ड एफएसनं उन्मेष यांच्या कंपनीकडून ५०० कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी २०१७ मध्ये करण्यात आली. त्यामुळं  हा संशयास्पद व्यवहार असल्याचं म्हटलं जातं आहे.



हेही वाचा -

अकरावी प्रवेशाची तिसरी यादी गुरूवारी होणार जाहीर

विद्यार्थी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर, ३० ऑगस्ट रोजी निवडणूक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा