Advertisement

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याविषयी माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.' असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, सौम्य लक्षणं जाणवत असल्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नागरिकांनी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे, असं आवाहन देखील आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

राज्यात कोरोना कहर कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात २५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी २५ हजार ६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग राज्याला पुन्हा लाॅकडाऊनकडे तर नेणार नाही ना याची चिंता सर्वांनाच लागली आहे. 

मागील तीन दिवस राज्यात रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचं दिसत आहे. बुधवारी २३ हजार १७९ तर गुरुवारी २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा २५ हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 

शुक्रवारी राज्यात ७० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५३ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे. शुक्रवारी १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत २१ लाख ८९ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्के आहे. 



हेही वाचा

मुंबईतील 'या' परिसरात सर्वाधिक रुग्णवाढ

वाढत्या कोरोना रुग्णांचं रेल्वे प्रशासनाला गांभिर्य नाही

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा