Advertisement

राज्यात वीजदर कपात फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच, भाजपचा दावा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या धोरणामुळेच राज्यातील जनतेला वीज स्वस्त मिळणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.

राज्यात वीजदर कपात फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच, भाजपचा दावा
SHARES

वीज नियामक आयोगाने येत्या १ एप्रिलपासून वीजदर सुमारे २ टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश वीज कंपन्यांना दिले आहेत. यामुळे देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या धोरणामुळेच राज्यातील जनतेला वीज स्वस्त मिळणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.

नियामक आयोगाने एका सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार १ एप्रिलपासून संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करावे लागणार आहेत.

हेही वाचा- ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक की गुड न्यूज? १ एप्रिलपासूनचे नवे दर जाणून घ्या

मात्र भाजपच्या धोरणाचं हे यश असल्याचा माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमन मुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास असे धोरण ठेवून निर्णय घेण्यात आले होते. या धोरणांतर्गतच राजकीय हस्तक्षेप टाळून ज्या कंपनीचा वीज दर कमी आहे, त्या कंपनीकडूनच वीज विकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढली. परिणामी कंपन्यांना नफा होऊ लागला. 

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुढील ५ वर्षातील वीज उत्पादन व खरेदी संदर्भातील अहवाल वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये हा अहवाल आयोगासमोर सादर केला. या अहवालाला मार्च २०२० मध्ये मंजुरी मिळाली. या अहवालात १ एप्रिल २०२१ पासून वीजदर २ टक्क्यांनी कमी करता येईल, असं नमूद केलं होतं. त्यामुळे हे फडणवीस सरकारच्या धोरणांचं फलित असून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(fadnavis government responsible behind electricity tariff rate cut says bjp leader chandrashekhar bawankule)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा