Advertisement

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
SHARES

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती सोमवारी आणखी बिकट झाली. प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसातील संसर्गामुळे सेप्टिक शॉक आला. मुखर्जी यांना १० ऑगस्टला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी जाहीर झालेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये रुग्णालयानं म्हटलं आहे की, "रविवारपासून मुखर्जीची प्रकृती खालावत आहे."

फुफ्फुसांच्या संसर्गामुळे त्यांच्या इतर काही अवयवांच्या कार्यावर देखील परिणाम होत होता. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होती. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या पण झाल्या होत्या. मेंदूत रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगला इथल्या बिरभूममध्येे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं.

ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते. २५ जुलै २०१२ ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं असून

इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणव मुखर्जी अनेक महत्वाच्या पदावर होते. अनेक महत्त्वाच्या खात्यांचं त्यांनी काम पाहिलं आहे. प्रणव मुखर्जी यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं अनेक वादंग निर्माण झाला होता.



हेही वाचा

वंचितने हिंदुत्व स्वीकारलं का? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत, यावर मला बोलायचं नाही- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा