Advertisement

युतीबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तिघांनाच, महाजन यांचा रावतेंना टोला

युतीबद्दल बोलण्याचे अधिकार फक्त ३ व्यक्तींनाच असल्याचं म्हणत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांच्यावर पलटवार केला.

युतीबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तिघांनाच, महाजन यांचा रावतेंना टोला
SHARES

युतीबद्दल बोलण्याचे अधिकार फक्त ३ व्यक्तींनाच असल्याचं म्हणत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेला १४४ जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं होतं.   

काय म्हणाले महाजन?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “युतीबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ३ व्यक्तींनाच आहे. जागावाटपाबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून पुढील ४ ते ५ दिवसांत जागावाटपाचा तिढा नक्की सुटेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.  

आरेपेक्षा इतर कामे महत्त्वाची

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेत होणाऱ्या वृक्षतोडीला शिवसेनेकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. याबद्दल महाजन यांना विचारलं असता ते म्हणाले, “आरेतील वृक्षतोडीला विरोध करणं ही शिवसेनेची भूमिका असू शकते. पण, मुंबईत आरेपेक्षाही रस्ते, वाहतूक, पाणी यासारखे असंख्य महत्वाचे प्रश्न आहेत. त्यावर देखील शिवसेनेने लक्ष द्यायला हवं,” असं म्हणत महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला.  

 


हेही वाचा-

१४४ जागा न मिळाल्यास युती तुटेल, दिवाकर रावते यांचा इशारा?

निवडणूक खर्चाची मर्यादा ‘इतक्या’ लाखांपर्यंत वाढवा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणीसंबंधित विषय
Advertisement