Advertisement

‘हा’ साधा चावटपणा नसून भलामोठा कट- जितेंद्र आव्हाड

केवळ १ लाख रुग्णांकडेच लक्ष वेधलं जात आहे, हा साधा चावटपणा नसून भलामोठा कट असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

‘हा’ साधा चावटपणा नसून भलामोठा कट- जितेंद्र आव्हाड
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या वर गेल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. असं असताना राज्यात ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे देखील झाले आहेत. परंतु त्याकडे कानाडोळा करून केवळ १ लाख रुग्णांकडेच लक्ष वेधलं जात आहे, हा साधा चावटपणा नसून भलामोठा कट (housing minister jitendra awhad reacts on criticism over increasing number of corona patients in maharashtra) असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: या आजारासोबत काही दिवसांपूर्वी दोन हात केले होते. त्यानंतर योग्य उपचार घेऊन ते पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. 

राज्यात रविवारी ३३९० नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ लाख ७ हजार  ९५८ वर जाऊन पोहोचला आहे. सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असून रविवारी १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाल्याची  माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- जितेंद्र आव्हाड

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. राज्यात ५ लाख  ८७ हजार  ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, असंही टोपे यांनी सांगितलं. 

अशा रितीने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या वर जाऊन पोहोचल्याने संपूर्ण देशात महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या परिस्थितीवर भाष्य सुरू आहे. विरोधकांकडूनही सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. कोरोनाचं संकट हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

त्यावर प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहेत की, राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी एक लाखावर गेली असली तरी त्यातील ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, हे सांगितलं जात नसून हा साधा चावटपणा नाही तर भलामोठा कट आहे. महाराष्ट्राकडे बोट रोखणाऱ्यांनी गुजरातचा मृत्युदर सांगावा, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लगावला आहे.  

गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २३,०३८ वर पोहोचली असून १५८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - हा तर भाजपचा महाराष्ट्रद्रोह, रेल्वेच्या खर्चावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा