• मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARE

मुंबई - गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी बुधवारी सेवानिवृत्त होतायत. त्यांच्या रिक्त जागी आता सुधीर श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलीय. मंत्रालयात मुख्य सचिवानंतर हे महत्वाचं पद समजलं जातं. गृहसचिवांसह इतरही विभागाच्या प्रमुखांची बदली करण्यात आलीये.

संजय कुमार (1984) यांच्याकडे गृहनिर्माण देण्यात आलंय. व्ही एस सिंग (1984) यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य खाते देण्यात आलंय. नवीन सोना (1999) यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक, कॉटन फेडरेशन सोपवण्यात आलंय. मनिषा वर्मा (1993) यांच्याकडे महिला आणि बालकल्याण देण्यात आलंय. इंदिरा मल्लू (1999) यांच्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळ देण्यात आलंय. मिता लोचन यांच्याकडे प्रकल्प संचालक, रुसाची जबाबदारी देण्यात आलीय. मनोज सौनिक (1987) यांच्याकडे परिवहन विभाग देण्यात आलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या