Advertisement

केंद्राने लस दिल्यास महाराष्ट्रात २ महिन्यांत लसीकरण पूर्ण करू- नवाब मलिक

रोजच्या रोज नवीन दावे करण्यापेक्षा केंद्र सरकारने कुठल्या राज्यांना किती डोस, कुठल्या तारखेला देईल, त्याचा पुरवठा कसा होईल, याची विस्तृत माहिती सांगावी.

केंद्राने लस दिल्यास महाराष्ट्रात २ महिन्यांत लसीकरण पूर्ण करू- नवाब मलिक
SHARES

केंद्र सरकारने केवळ रोजच्या रोज नवनवे दावे करण्यापेक्षा योग्य प्रमाणात लस उपलब्ध करून दिली. तर महाविकास आघाडीचं सरकार केवळ २ महिन्यांत लसीकरण पूर्ण करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना नवाब मलिक यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (Delta Plus) व्हेरियंटचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांपैकी केवळ एकाच रुग्णाने आधी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेता होता, असं आकडेवारी सांगते. यातून असं सिद्ध होतं की जर मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं, तर या व्हेरियंटपासून लोकांना असलेला धोका कमी होऊ शकतो.

आपल्याकडील लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत बोलायचं झालं, तर केंद्र सरकारने योग्य वेळेत महाराष्ट्राला लस उपलब्ध करून दिल्या, तर आम्ही २ महिन्यांमध्ये सर्व लोकांचं लसीकरण करू शकतो, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा- कस्तुरबा रुग्णालयात ‘Delta Plus’ चाचणी होणार

तसंच ६ ते ८ महिन्यांमध्ये संपूर्ण देशातील लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होईल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र यावर रोजच्या रोज नवीन दावे करण्यापेक्षा केंद्र सरकारने कुठल्या राज्यांना किती डोस, कुठल्या तारखेला देईल, त्याचा पुरवठा कसा होईल, याची विस्तृत माहिती सांगावी. उगाच दररोज नवीन डेडलाईनची घोषणा करू नये, असा टोलाही केंद्र सरकारला नवाब मलिक (nawab malik) यांनी हाणला. 

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र (maharashtra) दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. शनिवारी सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.  

एवढंच नाही, तर लसीकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

(if central govt provides enough vaccine maharashtra will complete covid 19 vaccination in 2 month says nawab malik)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा