Advertisement

मंदिर नाही, तर पुन्हा सरकारही नाही - उद्धव ठाकरे


मंदिर नाही, तर पुन्हा सरकारही नाही - उद्धव ठाकरे
SHARES

या सरकारकडून जर राम मंदिर उभारलं गेलं नाही, तर पुढे हे सरकारही बनणार नाही. मात्र, राम मंदिर तर बनूनच राहिल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.


पण मंदिर जरूर बांधा

उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीवर जाऊन सहपरिवार रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणा किंवा कायदा करा, पण मंदिर लवकरात लवकर बनवा, असं आवाहन भाजप सरकारला केलं. शिवाय या अयोध्या दौऱ्यामागे कुठलाही छुपा अजेंडा नाही. देशातील समस्त हिंदूंच्या भावना घेऊन आपण अयोध्येत आलो आहे. राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न सर्वांना पडल्याचं ते यावेळी म्हणाले.


भाजपला टोला

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामराम आणि निवडणुका संपल्या की आराम, असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला. आता राम मंदिरासाठी आणखी किती वाट पाहायची. राम मंदिर बांधण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचा असेल तर हा मुद्दा निवडणुकीत का आणता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.


आमचा पाठिंबा असेल

रामलल्लाच्या दर्शनासाठी जाताना मंदिरात जातो की जेलमध्ये? हेच कळत नव्हतं. याचं दुख वाटत होतं. पण आता हिंदू मार खाणार नाही. मंदिर कधी होणार असा प्रश्न विचारणारच, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. निवडणुका तोंडावर असून या सरकारचं हे अखेरचं अधिवेशन आहे. त्यात कायदा करा अन्यथा निवडणुकांआधी अध्यादेश आणा, आमचा पाठिंबा असेल. पण राम मंदिर बांधा, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा