Advertisement

राज्यात ‘अँटी बॉडी’ टेस्टवर जोर द्या- बाळा नांदगावकर

सरकारने संपूर्ण राज्यात ‘अँटी बॉडी’ टेस्ट करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्यात ‘अँटी बॉडी’ टेस्टवर जोर द्या- बाळा नांदगावकर
SHARES

राज्यातील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली, तरी त्यांच्या लक्षात आलेलं नाही. त्यामुळे सरकारने संपूर्ण राज्यात ‘अँटी बॉडी’ टेस्ट करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. (increase antibody test in maharashtra demands mns leader bala nandgaonkar)

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगत आहेत. परंतु राज्य सरकार कोरोनाबाधितांचे आकडे आणि कोरोनामुळे झालेली मृत्यूसंख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत कमालिचा फरक आहे. महाराष्ट्रात १३० हून अधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. स्वॅब टेस्टसोबतच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागात अँटीजेन चाचण्या देखील केल्या जात आहेत. परंतु या चाचण्या अत्यंत कमी प्रमाणात होत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. 

हेही वाचा - Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!

काही दिवसांपूर्वीच निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने मुंबईतील आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ६ हजार ९३६ लोकांचा

सेरो सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये झोपडपट्टीतील  ४ हजार लोकांचे तर बिगरझोपडपट्टी भागांतील  ३००० रहिवाशांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ या लोकांना कोरोना होऊनही गेला होता. मात्र त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्तीने त्यांना वाचवलं होतं.

हाच धागा पकडून मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हणाले की, राज्य सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी आता पूर्ण राज्यात "अँटी बॉडी" टेस्ट करण्यावर जोर द्यावा. अनेक सर्वेक्षणतून हे समोर आलं आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होऊनसुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही. 

खासगी लॅबमध्ये "अँटी बॉडी" टेस्टचे दर जवळपास हजार रुपये आहेत, ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोकं स्वतःहून ही टेस्ट करवून घेतील व यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असं मतही बाळा नांदगावकर यांनी मांडलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा