Advertisement

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद


शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद
SHARES

शिवडी - युती तुटली तरी शिवसेनेच्या नेत्यांमधली मक्तेदारी मात्र संपलेली नाही. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियातील सदस्याला तिकीट मिळावं यासाठी सध्या खुर्चीवर विराजमान असलेले नगरसेवक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांवर त्यामुळे अन्याय होणार असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी या अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार कि काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

शिवडी मतदार संघातील प्रभाग क्रमांक 206 हा पुरुष मागासवर्ग आरक्षित झाल्याने येथील शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता राणे यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे. मात्र स्वतःच्या वार्डात विकासाची कामे न करणाऱ्या नगरसेविका श्वेता राणे वॉर्ड 202 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले संजय आंबोले यांचा वॉर्ड 203 हा सर्वसामान्य महिला आरक्षित झाल्याने आपल्या पत्नीसाठी ते तिकीट मागत आहेत. अन्यथा 206 मधून तिकीट द्या अशी मागणी होत असल्याचे शिवसेना कार्यकर्ते सांगत आहेत. मात्र प्रभाग 206 मध्ये सचिन पडवळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत असले तरी ते या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने त्यांना या प्रभागातून तिकीट देण्यात येऊ नये असे स्थानिक इच्छुक उमेदवार उपशाखाप्रमुख विजय म्हात्रे यांचे म्हणणे आहे. तर म्हात्रे यांचे आमदार अजय चौधरी यांच्याशी घरचे संबंध असल्याने राजकारणातील कोणताही गंध नसलेल्या म्हात्रे यांना तिकीट दिल्यास येथील जागा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला जाण्याची दाट शक्यता शिवसेनेतील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. परंतु या बालेकिल्यात खंदे समर्थक न राहिल्याने शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा