Advertisement

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

तटकरे यांनी पदभार सोडल्यानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील या दोघांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. या शर्यतीत पवार यांचे निकटवर्तीय पाटील यांनी बाजी मारली.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 'मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबादारीतून मोकळं करा' म्हणत हे पद सोडल्यावर राष्ट्रवादीच्या राज्यातील नेतृत्वाची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांची निवड करण्यात आली.


दोघेजण शर्यतीत

तटकरे यांनी पदभार सोडल्यानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील या दोघांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. या शर्यतीत पवार यांचे निकटवर्तीय पाटील यांनी बाजी मारली.


प्रमुख नेत्यांची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली. बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित राहिले. त्यानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल होतील अशी अपेक्षा होती.


'अशी' झाली निवड

त्यानुसार कार्यकारिणीच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांनी अनुमोदन दिलं. यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जयंत पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आली. याचसोबत राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक आणि खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली.




हेही वाचा-

सुप्रिया ताई, तुम्हाला 'हे' शोभत नाही - प्रसाद लाड

मला जबाबदारीतून मुक्त करा- सुनील तटकरे

नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा