Advertisement

"माझ्या हत्येचा कट रचतेय ठाकरे सरकार'', सोमय्यांचा आरोप

याप्रकरणी किरीट सोमय्यांनी मुंबईत पोहोचून आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

"माझ्या हत्येचा कट रचतेय ठाकरे सरकार'', सोमय्यांचा आरोप
SHARES

भाजपा नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी मुंबईत पोहोचून आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Chief Minister Uddhav Thackeray) षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. तर सोमय्या राज्यपाल आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

मनसुख हिरेनच्या हत्येनंतर आता माझा हत्येचा कट रचत आहे ठाकरे सरकार. माझे हातपाय तोडायला सांगितले होते. तरीही पुणे पोलीस संथ गतीनं तपास करत आहेत. ठाकरेंच्या सरकारमधील घोटाळे बाहेर येणार म्हणून हे घाबरले आहेत. यामध्ये संजय राऊत, अनिल परब यांचा समावेश आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ला झाला, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे मी वाचलो असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे किरीट सोमय्यांनी दावा केला की, शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत. ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडनं मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता, असा आरोपही त्यांनी केलाय.



हेही वाचा

"हा नालायक आणि बेशरमपणा", संजय राऊत संतप्त

शिवाजी पार्कवर लता दिदींच स्मृतीस्थळ उभारा; भाजप आमदार राम कदमांची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा