Advertisement

आनंद परांजपे तिसऱ्यांदा नोंदवणार का विजय?


आनंद परांजपे तिसऱ्यांदा नोंदवणार का विजय?
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसनं आनंद परांजपे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांनी विजय मिळवला होता. परंतु २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राजकीय कारकीर्द
२००८ साली पोटनिवडणुकीत ठाणे मतदारसंघातून परांजपे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ साली त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजयश्री आपल्याकडे खेचून आणली होती. परंतु २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा २ लाख ५० हजार ७४९ मतांनी पराभव केला. ठाणे हा परांजपे यांचा जुना मतदारसंघ मानला जातो. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी २००८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. तसंच त्यानंतर ८ महिन्यांच्या कालावधीसाठी ते खासदार होते. परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कोणते खटले?
आनंद परांजपे यांच्यावर एकूण १४ खटले दाखल आहेत. १४ पैकी १४ खटले राजकीय प्रकरणांशीच जोडलेले आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांपैकी अद्याप एकाही खटल्यात त्यांनी दोषी ठरवण्यात आलेलं नाही.

शिक्षण
आनंद परांजपे यांनी १९९४ साली मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तसंच १९९७ मध्ये त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

संपत्ती
परांजपे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे २ कोटी ६० लाखांची जंगम आणि २ कोटी ३० लाखांची स्थावर मालमत्ता आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ४ कोटी १५ जंगम आणि १.६८ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे.


#MLviews

विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासमोर आनंद परांजपे यांनी चांगलंच आव्हान उभं केलं आहे. या मतदारसंघात शिवसेेनेची ताकद मागील ५ वर्षात वाढली आहे. मात्र, राष्ट्रवादीची ताकद अद्याप या मतदारसंघात बऱ्यापैकी असून विचारे आणि परांजपे यांच्या कडवी झुंज होणार हे नक्की. 



हेही वाचा  -

शिवसेनेचा गड असणाऱ्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसोपा?

कल्याणमधील राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार बाबाजी पाटील मारतील का बाजी?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा