Advertisement

कल्याणमधील राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार बाबाजी पाटील मारतील का बाजी?


कल्याणमधील राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार बाबाजी पाटील मारतील का बाजी?
SHARES

ठाण्यातील मोती देसाई गावातील एक दिग्गज सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबाजी पाटील यांना ओळखलं जातं. बाबाजी पाटील हे सध्या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्या ते टीडीसीसी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.

राजकीय कारकीर्द
बाबाजी पाटील यांनी २०१७ साली झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. पाटील हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं कल्याण लोकसभेच्या जागेवरून उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु त्यांच्यासमोर विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचं तगडं आव्हान असणार आहे. बाबाजी पाटील हे यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर एका गुन्ह्यासंदर्भात खटला सुरू आहे.

संपत्ती
बाबाजी पाटील यांच्याकडे एकूण २ कोटी ७० लाखांची जंगम आणि ३५ कोटींची स्थावर, तर त्यांच्या पत्नीकडे ३३ लाखांची जंगम आणि ९० स्थावर मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

शिक्षण
बाबाजी पाटील यांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत झांलं आहे. त्यांनी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदीरमधून १९८२ साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.


#MLviews

शिवसेनेचा गड असलेल्या कल्याणमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पुत्रासाठी मोठी ताकद लावली आहे. शिवसेनेसाठी सर्वच बाजू सरस असलेल्या कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचं तगडं आव्हान बाबाजी पाटील यांच्यासमोर आहे. पहिल्यांदाच लोकसभा लढवणारे बाबाजी पाटील हे श्रीकांत शिंदे यांच्यासमोर कमजोरच उमेदवार मानले जात आहेत. 



हेही वाचा -

भिवंडीकर पुन्हा ठेवतील का कपिल पाटील यांच्यावर विश्वास?

आनंद परांजपे तिसऱ्यांदा नोंदवणार का विजय?




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा