Advertisement

ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर गोविंदाच्या यशाची पुनरावृत्ती करणार का?


ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर गोविंदाच्या यशाची पुनरावृत्ती करणार का?
SHARES

बॉलिवूडमध्ये 'रंगीला'गर्ल अशी ओळख बनवणाऱ्या उर्मिला मातोंडकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मागील काही वर्षांपासून उर्मिला हिंदी चित्रपटांपासून दूरच होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची सेवा करायची आहे, असं म्हणत तिने राजकारणात उडी घेतली आहे. उर्मिलाला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिलासमोर भाजपाचे तडगे उमेदवार गोपाळ शेट्टी असल्यानं ही लढत ती जिंकणार का ? हे निवडणुकीनंतरच समजेल.

उत्तर मुंबईतून उमेदवारी

मागील अनेक वर्षांपासून सिनेमापासून दूर असलेल्या उर्मिलाने 'ब्लॅकमेल' सिनेमातील 'बेवफा ब्युटी' गाण्यावर आयटम डान्स करत चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यातच अचानक उर्मिला राजकारणात येणार अशी चर्चा रंगू लागली आणि बघता बघता २९ मार्च रोजी तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने पक्षप्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसनं उत्तर मुंबई मतदारसंघातून तिला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली.



...म्हणून राजकीय क्षेत्रात पाऊल

'बॉलिवूडमध्ये इतकं यश मिळवल्यानंतर राजकारणात येण्याची गरज काय ?’ असा सवाल पत्रकारांसह सामन्य जनतेनेनं तिला विचारला होता. या प्रश्नावर 'लोकशाही, मूलभूत हक्क, सर्वधर्म समभाव या संविधानाचा गाभा असणाऱ्या गोष्टी देशातून दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असहिष्णूता वाढली आहे. द्वेषाचं आणि सूडाचं राजकारण सुरू आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला', असा खुलासा तिने केला.

राजकारणाचा अनुभव नाही

उर्मिलाला राजकारणाचा फारसा अनुभव नसला, तरी मागील काही दिवसांपासून ती सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना दिसत आहेत. त्याशिवाय प्रचारासाठी सभा घेण्याऐवजी ती  घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरूपम यांना साडेचार लाख मतांनी हरवलं होतं. त्यामुळं यंदा लोकसभा निवडणुकीत उर्मिला भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांचा परभव करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


#MLviews

बॉलिवूडमध्ये 'रंगीला'गर्ल अशी ओळख बनवणाऱ्या उर्मिला मातोंडकरनं प्रथमच राजकारणात उडी घेतली आहे. उर्मिलाला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून उर्मिलासमोर भाजपाचे तडगे उमेदवार गोपाळ शेट्टी असल्यानं ही लढत अटीतटीची होणार का एकतर्फी होणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रिया दत्त यांचा निर्णय ठरेल का याेग्य?

राहुल शेवाळेंना पुन्हा मिळेल का मराठी मतांचा लाभ?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा