Advertisement

कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
SHARES

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिवार गुरूवारी दुपारी चेंबूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी कामत यांच्या चेंबूर येथील घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.


शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कामत यांचं पार्थिव शरीर त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सकाळी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. दुपारी १२ वाजेनंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आणि १२.४५ वाजेपर्यंत त्यांची अंत्ययात्रा चेंबूर स्मशानात पोहोचली. शासकीय इतमामात मानवंदना दिल्यानंतर १ वाजेनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


'या' मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या, कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी कामत यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.



हेही वाचा-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा