Advertisement

LIC कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक


LIC कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक
SHARES

नरिमन पॉइंट - एलआयसी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक झालीय. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा शिवसेना स्टाईलंन आंदोलन करू असा इशारा शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी दिलाय. वेतनकरार झाल्यानंतरही प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची पेशन्स, पाच दिवसांचा आठवडा, नवीन नोकरभरती यासंदर्भात कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाहीय. त्यामुळे शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिलाय.
एलआयसीमध्ये काही वर्षांपासून नवीन नोकरभरती न करता कर्मचाऱ्यांच्या हिताची नसलेली मोबिलिटी ट्रान्सफर पॉलिसीची (MTP) जबरदस्ती करून छळणं आणि मनस्ताप देण्याचा एलआयसी प्रशासनाचा कुटील डाव उधळवून लावू, असा जाहीर इशारा आमदार सुनील शिंदे यांनी दिलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा