Advertisement

शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद केलं रद्द

माजी उपमहापौर आणि विद्यमान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (maha vikas aghadi) त्याला जोरदार दणका दिला आहे.

शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद केलं रद्द
SHARES

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) यांचा अवमान करणारा अहमदनगर महापालिकेतील भाजपचा (bjp ex deputy mayor shripad chindam) माजी उपमहापौर आणि विद्यमान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (maha vikas aghadi) त्याला जोरदार दणका दिला आहे. 

सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायचं की नाही? त्यावर याचिका दाखल करायची की नाही?, याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही,' असं छिंदमनं या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

हेही वाचा- भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

अहमदनगर महापालिकेत (ahmadnagar municipal corporation) उपमहापौर पदी असताना श्रीपाद छिंदम (shripad chindam) यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद शब्द वापरले होते. ज्या कर्मचाऱ्याशी छिंदम बोलत होता त्या कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्याविषयी संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. 

तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने (ahmadnagar municipal corporation house) त्याचं पद रद्द झालं पाहिजे, असा ठराव केला होता. तर भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत छिंदम अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. पण या निवडणुकीत त्याचा विजय झाला.

माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप करणाऱ्यांविरोधात मला काहीही बोलायचं नाही. परंतु मी अहमदनगरमध्ये नसतानाही मला लोकांनी निवडून दिलं हा लोकांचाच विजय आहे, असं त्यावेळी छिंदमने सांगितलं होतं. अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक ९ इथून छिंदमला ४५३२ मतं मिळाली होती. छिंदम पद्मशाली समाजातील असून अहमदनगरमध्ये या समाजाची १५ हजारहून जास्त तर त्याच्या प्रभागा अडीच हजारांहून जास्त मतं आहेत.

त्यानंतर त्याने छत्रपतींना अभिवादन करून परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शिवप्रेमींच्या मनातील राग कमी झाला नाही. शिवसेनेसह (shiv sena) सर्व पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता.

हेही वाचा- घुसखोरांची माहिती द्या आणि ५ हजार मिळवा, मातोश्रीबाहेर मनसेचं पोस्टर

त्याची हकालपट्टी व्हावी, यासाठी भाजप (bjp corpotar) नगरसेवकही आग्रही होते. दरम्यान श्रीपाद छिंदम प्रकरणी नगरविकास विभागाने २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी केली. छिंदमला या सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु छिंदम हजर राहिला नाही. त्यामुळं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (urban development minister eknath shinde)  यांच्या कार्यालयात झालेल्या या सुनावणीत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा