Advertisement

‘हाच’ सरकारचा एकमेव धंदा- देवेंद्र फडणवीस

संपूर्ण सरकार बदल्यांच्याच मागे लागलं आहे, सध्याच्या स्थितीतही केवळ बदल्या करणं हाच सरकारचा एकमेव धंदा सुरू आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘हाच’ सरकारचा एकमेव धंदा- देवेंद्र फडणवीस
SHARES

संपूर्ण सरकार बदल्यांच्याच मागे लागलं आहे, सध्याच्या स्थितीतही केवळ बदल्या करणं हाच सरकारचा एकमेव धंदा सुरू आहे. आमच्या काळातही बदल्या झाल्या. परंतु त्यावेळी कोरोना असता आणि त्यातच बदल्यांचं सत्र सरू असतं, तर आमच्याकडे बोट दाखवता आलं असतं, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. (maha vikas aghadi government involved in officers transfer scam alleges opposition leader devendra fadnavis)

विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या दरवर्षी होतात. बदल्या होणं महत्त्वाचं देखील आहे. परंतु एखाद्या वर्षी बदल्या झाल्या नाहीत, तर फार मोठा फरकही पडत नाही. त्यामुळे कोरोनाचं संकट सुरू असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसत्या तरी चाललं असतं. बदल्यांचा भत्त्यापोटी वर्षाला ५०० कोटी रुपयांचा खर्च होतो. एका बाजूला सरकार म्हणतंय की नोकरदारांचा पगार देण्यासाठीही तिजोरीत पैसे नाहीत. असं असताना बदल्या कशासाठी सुरू आहेत? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा- राज्यात बदली घोटाळा, सीआयडी चौकशी करा- भाजप

संपूर्ण सरकार केवळ बदल्यांच्या मागे लागल्याचं दिसत आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. सगळे मंत्री, प्रशासन कोणाला कशी पोस्टिंग देता येईल, कुठे बदली करता येईल, यातच गुंतलेले आहेत. बदल्या आमच्याही सरकारमध्ये झाल्या. परंतु आमच्या काळात कोरोना नव्हता. जर आमच्या काळात कोरोना असता आणि बदल्या झाल्या असत्या, तर बोट दाखवता आलं असतं, असं म्हणणंही देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. 

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली मर्जीतील अधिकाऱ्यांकडून प्रचंड पैसे लाटले आहेत. त्यामुळे या बदली घोटाळ्याची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय काढला होता. त्यात चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल, असं म्हटलं होतं. तरीही जुलै महिन्यात राज्यात कोरोनाचं संकट वाढलेलं असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत १५ टक्के बदल्या कराव्यात असं स्पष्ट केलं. तसंच २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून या निर्णयाला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. 

हेही वाचा- दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा