Advertisement

महाविकास आघाडीत फूट?, संजय राऊत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडल्याचं म्हटलं जात आहे.

महाविकास आघाडीत फूट?, संजय राऊत म्हणाले…
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडल्याचं म्हटलं जात आहे. यावर प्रसारमाध्यमांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडं लागलं असेल, पण आमची भांडी काचेची नाहीत, त्यामुळे ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीत अंतर्गत वाद असल्याचा दावा फेटाळून लावला.

जलसंपदा विभागाच्या कामांची फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सुनावलं. असंच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, या शब्दांत आपला राग व्यक्त केला. तर जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून देखील जयंत पाटील यांनी सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा- मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात माॅर्डना कंपनीचं लसीकरण सुरू?

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकासआघाडी मधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. कोणी बाहेर कितीही अफवा पसरवल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडं लागलं असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तर, राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तेवढ्यापुरता तो विषय असतो. तसंच एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर नाराज असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची प्रथा नाही, असं म्हणत पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी हा विषय टाळला.

(maha vikas aghadi government is stable in maharashtra says sanjay raut)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा