‘वंचित’ मुळे ‘हे’ २३ उमेदवार जिंकता जिंकता राहिले

भाजपाची ‘बी’ टीम अशी टीका झेलणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.

‘वंचित’ मुळे ‘हे’ २३ उमेदवार जिंकता जिंकता राहिले
SHARES

भाजपाची ‘बी’ टीम अशी टीका झेलणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी २३ मतदारसंघात या दोन्ही पक्षांतील उमेदवारांन अत्यंत थोड्या फरकाने आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. 

५ ते १० हजारांचा फरक

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत युती करत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं खाल्ली होती. यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळाली. वंचितने २८८ जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मात्र या उमेदवारांनी तब्बल २३ मतदारसंघात १० हजारांहून अधिक मतं घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. 

तर, १२५ जागा

वंचितचे उमेदवार या जागांवर उभे नसते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या १२५ हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. या आधारे त्यांना भाजप-शिवसेनेला चांगली टक्कर देता आली असती.   


‘या’ जागा थोड्याफार मतांनी पडल्या 

चाळीसगाव 

 • भाजप - मंगेश चव्हाण - ८५, २८६  
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे  - राजीव देशमुख ८१, २८८ 
 • वंबआ - राकेश जाधव - ३८, ३६१ 

बुलडाणा

 • शिवसेना - संजय गायकवाड - ६७, ०३८
 • वंबआ -  विजय शिंदे - ४१, १७३
 • काँग्रेस -  हर्षवर्धन सपकाळ - ३०, ८१०

चिखली

 • भाजप - श्वेता महाले  - ९२, ७६०
 • काँग्रेसचे - राहुल बोंद्रे - ८६, ०७२
 • वंबआा - अशोक सुराडकर - ९,६०५ 

खामगाव 

 • भाजप - आकाश फुंडकर - ९०,१६७
 • काँग्रेस - ज्ञानेश्वर पाटील - ७३, ४६४ 
 • वंबआ - शरद वसतकर - २५, ८३९ 

अकोट

 • भाजप - प्रकाश भारसाखळे - ४८,२९९
 • काँग्रेस - संजय बोडखे - २७, ५०१
 • वंबआ - अॅड. संतोष राहाटे - ४१, १३९ 

बाळापूर 

 • शिवसेना - नितीनकुमार टाले - ६८, ९४५
 • वंबआ - धैर्यवर्धन पुंडकर - ५०, २८४
 • एमआयएम - डॉ. रहेमान खान हाजी खान - ४४, ३१३
 • राष्ट्रवादी - संग्राम गावंडे -१६, ३२९ 


अकोला पश्चिम 

 • भाजप - गोवर्धन शर्मा - ७२, ८३८ 
 • राष्ट्रवादी - साजीद खान - ७०,०००
 • वंबआ - मदन भारगड - २०,०००

अकोला पूर्व

 • भाजप - रणधीर सावरकर - ९९,७५८
 • वंबआ - हरिदास भदे -७५, २६३
 • काँग्रेस - विवेक पारसकर - ९,४४४ 

मूर्तीजापूर 

 • भाजप - हरिश पिंपळे - ५९,२४०
 • वंबआ - प्रतिभा अवचार - ५७, ३९९ 
 • काँग्रेस - ४०, ८४९ 

वाशिम

 • भाजप - लखन मलिक - ६५, ६४१
 • वंबआ- सिद्धार्थ देओले - ५२, ५०
 • काँग्रेस - रजनी राठोड - ३०, ४९३ 

धामनगाव रेल्वे 

 • भाजप - प्रताप अडसाड - ९०,३९३ 
 • काँग्रेस - वीरेंद्र जगताप - ८०,९७८ 
 • वंबआ - निलेश विश्वकर्मा - २३, ७०० 

नागपूर दक्षिण 

 • भाजप - मोहन मते - ८३,८७४
 • काँग्रेस - गिरीश पांडव - ७९, ८८७
 • वंबआ - रमेश पिसे - ५,५३५ 

बल्लाळपूर

 • भाजप - सुधीर मुनगंटीवार - ८५,६९७
 • काँग्रेस - डॉ. विश्वास झाडे - ५२,६१९ 
 • वंबआ - ३९, ७७९ 

चिमूर 

 • भाजप - बंटी भांगडिया - ८६,८५२
 • काँग्रेस - सतीश वारजूकर - ७७,१४६
 • वंबआ - अरविंद सांडेकर - २४, ३८४ 

राळेगाव 

 • भाजप - अशोक उईके - ९०, ५३०
 • काँग्रेस - वसंत पुरके - ८०,७०६
 • वंबआ - माधव कोहाले - १०, ६८२ 

यवतमाळ 

 • भाजप - मदन येरावार - ७९, ९१३ 
 • काँग्रेस - अनील मंगळुरकर - ७७,२७८ 
 • वंबआ - योगश पारवेकर - ७, ८१२ 

अर्णी

 • भाजप - डॉ. संदीप धुर्वे  - ८१, २४८
 • काँग्रेस - शिवाजीराव मोघे - ७८, ०८९
 • वंबआ - निरंजन मसराम - १२,२५३  

किनवट 

 • भाजप - भीमराव केराम - ८८,९७८ 
 • राष्ट्रवादी काँग्रेस - प्रदीप जाधव - ७५,८६४ 
 • वंबआ - प्रा. हेमराज उईके - ११, ६३९ 

नांदेड उत्तर

 • शिवसेना - बाजाली कल्याणकर - ६१, ९३४ 
 • काँग्रेस - डीपी. सावंत  - ४९, ९१६
 • वंबआ - मुकुंदराव चावरे - २६, ३७६ 

जिंतूर

 • भाजप - मेघना बोर्डीकर - १, १६, १४६
 • राष्ट्रवादी - विजय भांबळे - १, १२,५९७
 • वंबआ - मनोहर वाकळे - १३,१०७  

फुलंब्रीत 

 • भाजप - हरिभाऊ बागडे - १,५,७५५
 • काँग्रेस - डॉ. कल्याण काळे - ९०,५६०
 • वंबआ - जगन्नाथ रिठे - १५, १९९  

पैठण

 • शिवसेना - संदीपान भुमरे - ८३, ६१
 • राष्ट्रवादी - दत्तात्रय गोर्डे - ६८,९८७
 • वंबआ - विजय चव्हाण - २०, ५६४  

उल्हासनगर

 • भाजप - कुमार आयलानी - ४३,५७७
 • राष्ट्रवादी - ज्योती कलानी - ४१, ६३१
 • वंबआ - साजन सिंग - ५,६७७ हेही वाचा-

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयी

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २३ महिला आमदार विजयीसंबंधित विषय