Advertisement

विधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी


विधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी
SHARES

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहिर करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, शुक्रवार २० तारखेला कॉग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देतं याकडं सर्व विरोधी पक्षांचं लक्ष लागूल राहिलं आहे.   

५ उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं ५ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. महाराष्ट्रात जागावाटपावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पहिलाच निर्णय झाला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष १२५-१२५ जागांवर निवडणुक लढविणार आहेत. तसंच, बाकी ३८ जागांच वाटप मित्र पक्षांमध्ये करणार आहे.

पहिली यादी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीसाठी पहिली यादीत ५ उमेदवारांची नाव घोषित केली. यामध्ये धनंजय मुंडे (परळी), संदीप क्षीरसागर (बीड), विजय सिंह पंडित (गेवराई), प्रकाश सोळंकी (माजलगाव) आणि नमिता मूंदडा (काईज)यांनी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

समाजवादी पार्टीचा सहभाग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत समाजवादी पार्टीलाही सहभागी करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टी राज्यात ७ जागांवर कॉंग्रेससोबत निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. यामध्ये गोवंडी आणि भिवंडीच्या जागेचा समावेश आहे.हेही वाचा -

रेड अलर्टमुळं मुंबई-ठाण्याताली शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घरRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement