Advertisement

Maharashtra Assembly Election 2019 - मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी हॅटट्रिक करणार?


Maharashtra Assembly Election 2019 - मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी हॅटट्रिक करणार?
SHARES

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिमबहुल क्षेत्र आहे. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून मागील दोन निवडणुकांमध्ये अबू आझमी निवडून गेले आहेत. विविध पक्षांची स्थानिक कार्यालये या भागात आहेत. त्यामुळे लोकांचाही राजकीय सहभाग या ठिकाणी अधिक दिसून येतो. 

यंदा समाजवादी पक्षाने अबू आझमी यांनाच मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षही आहेत. अबू आझमी राज्यसभेचे सदस्यही होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आझमी यांनी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढविली. काँग्रेसचे सईद अहमद त्यांच्यासमोर होते. अबू आझमी यांनी अहमद यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत अबू आझमी यांना ३८ हजार ४३५  मते मिळाली. तर सईद अहमद यांना २४ हजार ३१८ मते मिळाली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा अबू आझमी यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली. आझमी यांच्यासमोर शिवसेनेचे सुरेश कृष्णराव पाटील होते. आझमी पुन्हा एकदा ४१ हजार ७१९ मते मिळवत विजयी झाले. सुरेश पाटील यांना ३१ हजार ७८२ मते मिळाली. 

३४२ बूथ असलेल्या या मतदारसंघातील प्रत्येक गल्लीमध्ये नशेच्या विळख्यात असलेली मुले दिसून येतात. दिवसाढवळ्या खून आणि इतर गुन्हे इथं रोजचेच आहेत. या मतदारसंघात डंपिंग ग्राऊंड असल्याने अनेक लोक टीबी आणि दम्याच्या आजाराने ग्रस्त आहेत. या मतदारसंघात एकही चांगलं सरकारी हाॅस्पिटल आणि मोठी शाळा नाही. 

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ एकूण ३ लाख ५० हजार मतदार आहेत. यामध्ये १ लाख ६२ हजार मुस्लीम मतदार, ८५ हजार मराठी, ३८ हजार उत्तर भारतीय, १५ हजार ख्रिश्चन, ८ हजार गुजराती - राजस्थानी, १ हजार पंजाबी आणि इतर मतदार आहेत. 



हेही वाचा  -

Maharashtra Assembly Election- दहिसर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Maharashtra Assembly Election – मालाड पश्चिम मतदारसंघातून कोण येणार निवडूण?

हेही वाचा  -

Maharashtra Assembly Election- दहिसर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Maharashtra Assembly Election – मालाड पश्चिम मतदारसंघातून कोण येणार निवडूण?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा