संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे, निलेश राणेंची टीका

शिवसेना नेते ​संजय राऊत​​​ गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे असल्याची टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

SHARE

महाराष्ट्रातील सत्ता वाटपाच्या वादातून भाजपावर दरदिवशी रोखठोक प्रहार करणारे शिवसेना नेते संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे असल्याची टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

हेही वाचा- सस्पेन्स वाढला, राष्ट्रवादी-काँग्रेसची बैठक रद्द

शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर करण्यात आल्याची घोषणा भाजपकडून नुकतीच करण्यात आली. त्यावर ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपवर चांगलीच टीका करण्यात आली आहे. स्वत:ला हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखं वर्तन केलं नाही. महाराष्ट्र हा शिवाजी महाराज व संभाजी राजांचा आहे. तो मंबाजींना साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. हिंमत असेल तर अंगावर या. आम्ही तयार आहोत, असं आव्हानच या अग्रलेखातून भाजपला देण्यात आलं होतं.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर? 'हे' असू शकतं कारण

त्यावर अद्याप भाजपच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेली नसताना नुकतेच भाजपवासी झालेल्या नितेश राणेंनी ट्विटरवरून राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘एनडीए’ची बैठक नाकारायची आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची. संजय राऊत म्हणजे कुठलंही कारण नसताना वाॅचमनशी जाऊन भांडणारे गल्लीतील कुजक्या म्हाताऱ्यासारखे आहेत. असं म्हटलं आहे. हेही वाचा-

शिवसेना एकटी पडली, शरद पवारांचं घुमजाव?

सरकार स्थापनेचा गाेंधळ फक्त मीडियाच्या मनात, संजय राऊत यांचा टोला


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या