Advertisement

शिवसेनेला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंनी दिला अधिकृत प्रस्ताव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला.

शिवसेनेला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंनी दिला अधिकृत प्रस्ताव
SHARES

भाजपने सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला.

हेही वाचा- छातीत दुखू लागल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात

शिवसेनेला संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीत शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव पवार यांच्याकडे देण्यात आल्याचं समजतं.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीतील बैठक संपल्यानंतर काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय घेणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी देखील आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यास काही तासांचाच अवधी उरलेला असताना प्रत्येक क्षणाला सस्पेन्स वाढतच चालला आहे.   



हेही वाचा-

म्हणून दिला राजीनामा, काय म्हणाले अरविंद सावंत?

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा