शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ट्विट करत शुक्रवारी भाजपावर निशाणा साधला.
आग्नेय परीक्षा की
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2019
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’
- अटल बिहारी वाजपेयी
(गीता का संदेश- *न दैन्यं न पलायनम्* अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है)
राऊत यांनी ट्विट केलेली कविता अशी आहे, “आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें: ‘‘न दैन्यं न पलायनम्।”. आव्हानांपासून पळ न काढता, त्यांच्याशी दोन हात करणं गरजेचं आहे, असा संदेश गीतेतून देण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं माध्यमांना वाटत असल्यास महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नसल्याचं म्हणावं लागेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणासमोर झुकले नाहीत तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही कोणासमोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटलं.
हेही वाचा-
भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत
भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप