Advertisement

Maharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित

माहुलमध्ये राहणाऱ्या १६०० रहिवाशांना मात्र यंदाही मतदानापासून वंचित राहावं लागलं.

Maharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित
SHARES

मुंबईसहीत राज्यभर २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. राज्याच्या कानाकोपऱ्यातील मतदारांनी या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र माहुलमध्ये राहणाऱ्या १६०० रहिवाशांना मात्र यंदाही मतदानापासून वंचित राहावं लागलं. 

मुंबईतल्या विविध भागातील प्रकल्पग्रस्त रहिवाशांना माहुलमधील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आलं होतं. परंतु येथील जीवघेण्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर पुन्हा या रहिवाशांना अन्यत्र हलवण्यात आलं. परंतु असं करत असताना निवडणूक आयोगाने इथं राहणाऱ्या मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकली. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील या मतदारांना मतदान करता आलं नव्हतं. यासंदर्भातील तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु रहिवाशांच्या समस्येकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने या रहिवाशांना यंदाही मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे. 



हेही वाचा-

Exit Polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे?

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद? असं कोण म्हणालं- भूपेंद्र यादव



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा