Advertisement

११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, 'हे' आहे कारण

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, 'हे' आहे कारण
SHARES

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनंही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या ११ ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला. हा बंद पक्षाच्या वतीनं आहे सरकारच्या वतीनं नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबरला बंद करणार आहोत. आज मंत्रिमंडळानं देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहिली. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे. संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. त्यावेळी विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्यानं कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले.

यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डनं विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रनं हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.



हेही वाचा

क्रूझ कारवाईचे भाजप कनेक्शन, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही हे निश्चित - संजय राऊत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा