Advertisement

क्रूझ कारवाईचे भाजप कनेक्शन, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

एनसीबीनं कारवाई करत अटक केलेल्या आर्यन खान प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. याप्रकरणी नवाब मलिकनं भाजपवर आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत.

क्रूझ कारवाईचे भाजप कनेक्शन, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
SHARES

रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

एनसीबीनं क्रूझवर छापा मारलाच नव्हता. भाजपच्या एका उपाध्यक्षानेच ही कारवाई केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यानं कोणत्या अधिकारात ही कारवाई केली? एनसीबीही भाजपची शाखा झाली आहे का?, असे सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

एका व्यक्तीचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. सुरुवातीला तो एनसीबीचा अधिकारी आहे अशी चर्चा होती. पण नवाब मलिक यांनी व्हिडिओ दाखवत हा गैरसमजही दूर केला.

ते म्हणाले की, व्हिडिओमध्ये आर्यन खानला घेऊन जाणारा व्यक्ती आणि त्याच्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती एकच आहे. मनिष भानुशाली असं त्याचं नाव अशून तो भाजपचा उपाध्यक्ष आहे. 

त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत म्हटलं की, दुसरा आरोपी अरबाज मर्चंडला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती के.पी. घोसावी आहे. तो पण भाजपचाच आहे. 

मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असं नवाब मिलक यांनी सांगितलं. तर भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

एनसीबीनं त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसंच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला.

एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.

काही फोटो एनसीबीनं जारी केलेत. त्यात काही अमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून जारी करण्यात आले आहेत. हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत. किरण गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.



हेही वाचा

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही हे निश्चित - संजय राऊत

मुंबईतल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करावा : अमित देशमुख

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा