Advertisement

केंद्रामुळेच महाराष्ट्रातील लसीकरण थांबलंय- नवाब मलिक

केंद्राकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळेच महाराष्ट्रात काही ठिकाणी लसीकरण थांबलं आहे, असा आरोप पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

केंद्रामुळेच महाराष्ट्रातील लसीकरण थांबलंय- नवाब मलिक
SHARES

केंद्राकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळेच महाराष्ट्रात (maharashtra) काही ठिकाणी लसीकरण थांबलं आहे, असा आरोप पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांना मोफत लसीकरण करण्याबाबत निर्णय आज कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. यासाठी सुमारे साडे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र राज्यात लशींच्या तुटवड्यामुळे १ मे पासून या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करणं अवघड आहे.

राज्य सरकारकडे लसीकरणाची पुरेसी क्षमता आहे. आम्ही दिवसाला ७ लाख लोकांचं लसीकरण करू शकतो. परंतु केंद्राकडून राज्याला म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात लसीच उपलब्ध होत नसल्याने राज्यात ठिकठिकाणी लसीकरण बंद ठेवावं लागत आहे. सध्या देशात २ कंपन्याच लसीचा पुरवठा करत आहेत. एकूण लसींपैकी अर्ध्या लसी केंद्र सरकार घेणार आहे. उरलेल्या लसींपैकी जी कंपनी आम्हाला लवकरात लवकर लस उपलब्ध करून देईल त्या कंपनीला आम्ही ऑर्डर देऊ. जशी जशी लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, असं नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं.

हेही वाचा- शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्यात लशी उपलब्ध असून देखील राज्य सरकार म्हणाव्या त्या प्रमाणात लसीकरण करत नाहीय. खोटे आकडे दाखवून लोकांना घाबरवण्याचं काम सरकार करत आहे, असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आरोप करत आहेत, याबद्दल विचारलं असता, मला वाटतं की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी जे बोलतायत ते योगी सरकार व भाजपशासित राज्यांबद्दल बोलत आहेत. महाराष्ट्र राज्यात पारदर्शक पद्धतीने कारभार चालू आहे. लपवालपवीचे काम भाजपवाल्यांचं आहे, आमचं नाही, असं उत्तर नवाब मलिक यांनी दिलं.

(maharashtra cabinet minister nawab malik allegations on central government for not providing enough covid 19 vaccine)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा