महाराष्ट्राचे (maharashtra) काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (eknath shinde) ठाण्यातील (thane) जुपिटर रुग्णालयात दाखल (admit) करण्यात आले आहे. प्रकृती ठीक नसून तब्येत सतत खालावत असल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे बोलले जात आहे.
तथापि, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, "बढिया है."
सातारा येथील त्यांच्या मूळ गावी गेल्यावर एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली होती. एकनाथ शिंदेंना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाला असून ते वैद्यकीय निरीक्षणाखाली होते.
एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी होत असल्याची माहिती त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी नंतर मीडियाला दिली. एकनाथ शिंदे रविवारी साताऱ्याहून मुंबईत परतले.
दरम्यान, सध्या 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्राच्या नव्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची (oath ceremony) आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात असले तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची 4 डिसेंबरला बैठक होणार आहे.
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी सोमवारी कार्यक्रमस्थळी भेट दिली. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रभरातील धार्मिक नेते, कलाकार आणि लेखकही यात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा