Advertisement

उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता- संजय राऊत

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दुसरा सक्षम विरोधीपक्ष नेता मी अजूनपर्यंत बघितलेला नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोमणा हाणला.

उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता- संजय राऊत
SHARES

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दुसरा सक्षम विरोधीपक्ष नेता मी अजूनपर्यंत बघितलेला नाही. इतिहासात त्यांचं नाव उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून लिहिलं जाईल याची खात्री आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोमणा हाणला. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचंही राऊत म्हणाले. (maharashtra cm uddhav thackeray has potential to lead a nation says shiv sena mp sanjay raut)

काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना, हे अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाहीय. त्यामुळे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल आणि एक दिवस ते जाईल. ही एक अनैसर्गिक आघाडी आहे. अनैसर्गिक आघाडी देशाच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत फारकाळ चाललेली नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते काय म्हणताहेत, याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

त्याकडे लक्ष वेधलं असता, फडणवीस यांनी सरकारबद्दल त्यांचं मत मांडलं आहे. हे मत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला जे वाटेल, तशी भूमिका ते मांडतील, मतभिन्नता ही राहणारच, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पुढं काय निर्णय घेणार?- देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्या विरोधात लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. नाहीतर आपण रोज भेटून अशाच चर्चा करत राहू. मात्र आपल्याला लढायचं असेल तर ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे, असं रोकठोक मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडलं. 

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं त्यांचं कधीच नसतं. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केलं आहे. या सगळ्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असं माझं मत आहे. कारण उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे. महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत. पण त्यांच्यासोबत हे काम सर्वांनीच केलं पाहिजे, असं मला वाटतं, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा - मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं?- उद्धव ठाकरे 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा