Advertisement

ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पुढं काय निर्णय घेणार?- देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे, याकडं आम्ही लक्ष देणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पुढं काय निर्णय घेणार?- देवेंद्र फडणवीस
SHARES

काँग्रेससारख्या इतक्या मोठ्या पक्षाला जिथं आपला अध्यक्षच ठरवता येत नाही, तिथं हा पक्ष पुढं काय निर्णय घेणार, त्यामुळे महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे, याकडं आम्ही लक्ष देणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. (bjp leader and opposition leader devendra fadnavis reacts on congress leadership crisis )

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाकडे लक्ष वेधलं असता, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला हा टोला हाणला. फडणवीस म्हणाले, काँग्रेसचा अध्यक्ष कोण करायचा, यावरून त्यांच्याच पक्षात इतके वाद चाललेत, सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी राहायचं नाही, पण त्यांनाच राहावं लागतंय. खरं म्हणजे इतक्या जुन्या पक्षामध्ये साधा एक अध्यक्ष ठरवा येऊ नये, अशी पक्षाची अवस्था का झाली, याचं त्यांनी आत्मचिंतन करावं. 

हेही वाचा - जे वडेट्टीवारांच्या मनात, ते राहुल गांधींच्या नाही- संजय राऊत

हे अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाहीय. त्यामुळे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल आणि एक दिवस ते जाईल. ही एक अनैसर्गिक आघाडी आहे. अनैसर्गिक आघाडी देशाच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत फारकाळ चाललेली नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते काय म्हणताहेत, याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास, त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली, तर आम्ही राज्यातील सत्ता सोडू, असं काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते. 

त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत आमचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या मनात जे आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात नक्कीच नाही, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - तर, महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडू, काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा