Advertisement

परवडणाऱ्या वाहतुकीवर भर- उद्धव ठाकरे

परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

परवडणाऱ्या वाहतुकीवर भर- उद्धव ठाकरे
SHARES

परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं.

महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित  ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिनाय कौनलकिस, थेरेसा शॉपर, मिनिस्टर ऑफ स्टेट, मिनिस्टरी ऑफ बेडेन-वुटमबर्ग, ख्राईस्टचर्चच्या मेयर लियान डॅलझिअल, न्यू साऊथ वेल्सच्या गव्हर्नर मार्गारेट बेझली यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.

या परिषदेत शहर, राज्य आणि नवी जागतिक व्यवस्था यावर चर्चा झाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अक्षय माथूर यांनी प्रास्ताविक केलं, तर अध्यक्ष सुजय जोशी यांनी स्वागत केलं.

हेही वाचा- मनसेच्या बालेकिल्ल्यात नव्या शिलेदाराची निवड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाने सगळ्या जगाचं पॉझचं बटन दाबलं असलं तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे, तेही शिकविलं आहे. कोरोनाने (coronavirus) आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविलं आहे. विकास सगळ्यांना हवा आहे. पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे.

परवडणाऱ्या घरांविषयी आपण बोलतो, त्याचप्रमाणे आपल्याला आता परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक अशा वाहतुकीविषयीही बोलावं लागेल. मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो, त्याचप्रमाणे मुंबईच्या मधोमध ८०० एकर आरेचा भूभाग वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय याविषयी यावेळी माहिती देण्यात आली.  

कोरोनावर निश्चित औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचं किती महत्त्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजलं असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई (mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी असून याठिकाणी समुद्रकिनारे, उद्याने, गुंफा, जंगल असूनदेखील मुंबईतील विकासाकडे सर्वांचं लक्ष असतं, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

(maharashtra cm uddhav thackeray speaks on reasonable transport for mumbai)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा