Advertisement

भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार- अशोक चव्हाण

मागील साडेचार वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना सरकारने राज्यात जो भ्रष्टाचार केला तसंच विविध योजना राबवण्यात सरकारला जे अपयश आलं, ते लपवण्यासाठी राज्य सरकारने केलेला प्रयत्न म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार- अशोक चव्हाण
SHARES

मागील साडेचार वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना सरकारने राज्यात जो भ्रष्टाचार केला तसंच विविध योजना राबवण्यात सरकारला जे अपयश आलं, ते लपवण्यासाठी राज्य सरकारने केलेला प्रयत्न म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली. 

चव्हाण म्हणाले, प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आलं आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश देऊनही या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही. त्यामुळेच प्रकाश मेहता यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना केवळ मंत्रिमंडळातून बाजूला करुन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते भ्रष्टाचाराचं पाप लपवू शकणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. 

मंत्रिमंडळ विस्तार निरर्थक असल्याची जाणीव शिवसेना पक्षप्रमुखांना असल्यानेच ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याऐवजी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले आहे. तसंच आमदारकीचा राजीनामा दिलेल्या व्यक्तीला थेट मंत्रीपद देण्याचा प्रकार म्हणजे लोकशाही संकेतांचा भंग असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. 


हेही वाचा -

राज्याचा आर्थिक पाहणी अहवालही फुगवला? विरोधकांनी केली आकडेवारी तपासण्याची मागणी

'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विरोधकांनी केलं मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांना लक्ष्य



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा